Akola Crime Team Lokshahi
ताज्या बातम्या

Akola Crime : धक्कादायक ! जावयाने केली सासऱ्याची हत्या

अकोल्यामधील (akola) तेल्हार पोलीस स्टेशनच्या (Telhar Police Station) अंतर्गत ग्राम पाथर्डी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Published by : Team Lokshahi

माहेरी गेल्या पत्नीला आणायला पती तिच्या घरी गेला होता. यावेळी जावयाचे आणि सासऱ्याचे जोरदार भांडण झाले. आणि जावयाने रागाच्या भरात सासऱ्यावर धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी सासऱ्याचा जागीच मृत्यु झाला आहे. आकोल्यामधील (akola) तेल्हार पोलीस स्टेशनच्या (Telhar Police Station) अंतर्गत ग्राम पाथर्डी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार पाथर्डी येथील मृतक गजानन पवार (Gajanan Pawar) हे 55 वर्षांचे होते. त्यांची मुलगी गेल्या चार महिन्यापासून त्याच्याकडे राहत होती. काल 23 एप्रिलला आरोपी जावाई निलेश विठ्ठल धुरंदर (Nilesh Vitthal Dhurander) वय 35 वर्षीय असून तो आपल्या पत्नीला घेऊन जायला चार वाजेच्यासुमार गेला. त्यावेळी तिचे वडील घरी नव्हते. तर तिने तिच्या पतीला सांगितले की वडीलांना येऊ द्या. नंतर बघू असे बोलून पतीला नकार दिला. काही वेळाने तिचे वडील घरी आले आणि त्यांच्याबरोबर वाद घालून तो तिथून निघून गेला. त्याच रात्री मृतक गजानन पवार हे अंगणात खाटेवर झोपले होते. मध्यरात्री 3.30 च्या सूमारास झोपलेल्या सासऱ्याच्या मानेवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यानंतर ते रक्तबंबाळ झाले. जावई हल्ला करत असताना मृतक गजानन पवार यांनी आरडाओरड केला असता त्यांची मुलगी धावत बाहेर आली तेव्हा तिच्या पतीच्या हातात चाकू होता. तो पुन्हा वार करणार तोच त्यांच्या मुलीने तिच्या पतीला ढकलून दिले आणि आरडाओरड करायला लागली. तेव्हाचं आरोपी तेथून पळून गेला.

मात्र त्यांना दवाखान्यात नेण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचले. आणि आरोपीचा दोन तास शोध घेतल होते. आरोपी (निलेश विठ्ठल धुरंदर) जावयाला अटक करून आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीवरून तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर कलम 302,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात केला आहे

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, जयंत पाटील रिंगणात

Maharashtra Assembly Elections : मोठी बातमी! राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाची पहिली यादी जाहीर

Bomb Threat | विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे सत्र सुरुच, आज पुन्हा 85 विमानं उडवण्याची धमकी