नीट प्रकरणाची पुन्हा सुनावणीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. देशात मोठ्या प्रमाणात पेपरलीक नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. नीटचा विषय फक्त बिहार पुरता मर्यादीत असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तर नीटमध्ये पेपर लीक झाला आणि त्यामुळेच कटऑफ वाढल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या होत्या पण त्याची सुनावणी घेताना निर्णय आला होता सुप्रीम कोर्टाकडून आणि पुन्हा परिक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.