Aditya Thackeray 
ताज्या बातम्या

मतदानाचा टक्का का घसरला? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगाला केली 'ही' विनंती

देशासह राज्यात मतदानाचा टक्का कमी झाल्याचं मतदान केंद्रांवरील आकडेवारीनुसार समोर आलं आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत मतदानाचा टक्का कमी का होतोय, याबाबत माहिती दिलीय.

Published by : Naresh Shende

Aditya Thackeray Tweet Viral : देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. परंतु, देशासह राज्यात मतदानाचा टक्का कमी झाल्याचं मतदान केंद्रांवरील आकडेवारीनुसार समोर आलं आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत मतदानाचा टक्का कमी का होतोय, याबाबत माहिती दिलीय. तसच मुंबईकर आणि मतदारांची मदत करावी, अशी विनंती ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केली आहे.

आदित्य ठाकरे ट्वीटरवर काय म्हणाले?

हा व्हिडीओ निवडणूक आयोगासाठी आहे. आज मुंबईत मतदान असून मुंबईकर मतदानासाठी आले आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून अनेक मुंबईकर मतदानासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. मतदान केंद्रावरील पोलिंग बूथवर सोयी सुविधा फार कमी आहेत. लोक उन्हात उभे आहेत. काही जणांना चक्कर आली आहे. पाण्याची सोय नाही आहे. पंखे नाहीत. सावलीत कुठेही रांगा उभ्या केल्या नाहीत. ही जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाची आहे. आम्ही तिथे काहीच करु शकणार नाही. आम्ही प्रयत्न जरी केला, तरी आमच्यावर केस होते. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आम्ही सर्व मुंबईकर गेले अनेक दिवस रस्त्यावर उतरल्यावर पाहत होतो की, निवडणूक आयोगाकडून आम्हाला मेसेज, कॉल येत होते.

सेलिब्रिटिंना घेऊन व्हिडीओ बनवले गेले. मतदानाला जा, मतदान करणं तुमचा अधिकार आणि कर्तव्यदेखील आहे. अनेक ठिकाणी, अनेक पोलिंग बूथवर मतदानाचा टक्का खूप कमी होत आहे, कारण लोक रांगेत उभे आहेत. घड्याळ घालायचं की नाही घालायचं? फोन आत न्यायचा की नाही न्यायचा, हा सर्व गोंधळ आता बाहेर येत आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करतोय की, मतदान नीट झालं पाहिजे. कृपया करून तुम्ही मुंबईकरांची आणि मतदारांची मदत करावी. उष्णता वाढत चालली आहे. मतदानाचा टक्काही वाढेल. पण आज जे मुंबईकर रांगेत उभे आहेत, त्यांना तुम्ही मदत करा. आपल्या सर्वांनाच मतदानाची गरज आहे. तो आपला अधिकार आहे आणि हक्क आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news