ताज्या बातम्या

देशातील प्रत्येक प्रकल्प आणि प्रत्येक गोष्ट ही अदानीला का? वर्षा गायकवाड यांचा सवाल

आज धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा धारावी बचाव मोर्चा हा धारावी ते बीकेसी असा होणार आहे.

Published by : shweta walge

देशातील प्रत्येक प्रकल्प आणि प्रत्येक गोष्ट ही अदानीला का? आणि त्या प्रकल्पामध्ये अदानीचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल याचाच विचार केलेला का दिसतोय? असा घनाघाती सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीला विचारला आहे.

आज धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा धारावी बचाव मोर्चा हा धारावी ते बीकेसी असा होणार आहे. आणि याच मोर्चामध्ये महाविकास आघाडीमधील घटक म्हणून काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या सहभागी होणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये कारण काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. भाजपा सारखी दहशत किंवा हुकूमशाही नाही असाही वर्षा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती