WhatsApp  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Whatsapp चे नवीन फिचर, आता दुप्पट सदस्य करा अन् मोठी फाईलही पाठवा

Instant मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp ने नवीन फीचर लाँच केले आहे. आता तुम्ही तुमच्या Whatsapp ग्रुपमध्ये २५६ ऐवजी ५१२ सदस्य ग्रुपला जोडू शकता.

Published by : Team Lokshahi

Instant मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp ने नवीन फीचर लाँच केले आहे. आता तुम्ही तुमच्या Whatsapp ग्रुपमध्ये २५६ ऐवजी ५१२ सदस्य ग्रुपला जोडू शकता. याशिवाय, आता तुम्ही mags मध्ये 2GB आकाराच्या फाइल्स पाठवू शकाल. Whatsapp ने आपल्या नवीन अपडेटमध्ये हे फीचर्स लाँच केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये केवळ 256 सदस्य समाविष्ट केले जाऊ शकत होते. परंतु नवीन अपडेटनुसार, आता तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 सदस्य जोडू शकता. Whatsapp ने 23 जून रोजी एक नवीन अपडेट जारी केले आहे, ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने लॉन्च केलेल्या नवीन फीचरनुसार ग्रुप मेंबर वाढवण्यासोबतच आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे 2GB आकाराच्या फाइल्स पाठवू शकता.

मेसेज एडिटींगचं फीचर

व्हॉट्सअ‍ॅप लवकरचं मेसेज एडिटींगचं फीचर आणणार आहे. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर एडिट (Edit) बटणाची चाचणी करण्यात येणार आहे. याआधी मेसेज चुकला तर एकापाठोपाठ एक मेसेज डिलीट केला जात असे. पण आता तो मेसेंज एडीट करता येणार आहे. पाठवलेल्या मेसेजमध्ये फेरबदल करता येत नसल्याने तो डिलीट करावा लागतात असे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आता एडीट बटण हे नवीन फीचर्स उपलब्ध करणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप iOS आणि डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये देखील अशीच वैशिष्ट्ये असणार आहेत. याबद्दलची अधिक माहिती समोर आली नाही आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण