मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही बैठक झाल्यानंतर राहुल शेवाळे यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली.
राहुल शेवाळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काय करायचं याबाबत चर्चा झाली. शिवसेनेच्या १३ खासदारांच्या लोकसभेच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. १३ खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांच्या ठिकाणी शिवसेना-भाजपा-आरपीआयचे संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेनेने ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली, त्या २२ जागांबाबत तयारी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. असे राहुल शेवाळे म्हणाले.