लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.
लोकशाही संवाद या कार्यक्रमाच्या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना फेक नॅरेटिव्हबद्दल प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, संविधान बदलणार असं काँग्रेस पक्षाचे किंवा इतर पक्षाचे नेते ते सातत्याने प्रचार करत आलेत. आज नव्हे 50 वर्षापूर्वीपासून सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसपासून पुढे सातत्याने हा निर्णय दिलेला आहे.
मुलभूत ढाचा जो संविधानाचा आहे तो कोणीही बदलू शकत नाही 500 जागा आल्या तरीही तुम्ही ते बदलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे जी प्रत्येकाला माहित आहे. संसदेत बसणाऱ्या लोकांना तर 100 टक्के माहित आहे. तरीही हा खोटा प्रचार करणं मला वाटतं यालाच फेक नॅरेटिव्ह म्हणतात आणि त्यामुळे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो आता राज्यात फेक नॅरेटिव्ह चालणार नाही असे राहुल नार्वेकर म्हणाले.