ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil | कोणाचे आमदार पाडणार? मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभेचा प्लॅन काय?

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उमेदवार आणि मतदारसंघ ३ तारखेला जाहीर करण्याचे सांगितले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.

Published by : shweta walge

सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच ठरवलं आहे. यातच आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. येत्या 3 तारखेला भूमिका जाहीर करणार आहे. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत खास बैठक बोलवली होती. या बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्हाला संपवायचं आहे. त्यांचं राजकीय करिअर संपवायचं आहे. लोकशाही प्रमाणे आम्ही हा उचलेला विडा आहे. तो पण आम्ही कडेला न्यायचं ठरवलं आहे. मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणून जगाव. मायक्रो ओबीसींना, शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.

आता परिवर्तन होणार आहे. आम्हाला देवेंद्र त्यांनी लै शिकवलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. आम्ही लोकशाही मार्गाने चाललोय. कधी जात म्हणून मी बघणार नाही असेही ते म्हणाले. सध्या शेती मालाला दर नाही, दुधाला दर नाही असेही जरांगे म्हणाले.

आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्दाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आपला समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना काय दिलं आहे असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. गेल्या 75 वर्षीत वीज पाणी यावरच बोलत आहेत असे जरांगे म्हणाले. अन्याय होऊ न देण्यासाठी ही लढाई आहे. आमची सहनशक्ती संपली आहे. तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार असे जरांगे म्हणाले.

सगळ्या जाती धर्मासाठी दोन दिवस गॅप ठेवला आहे. लिंगायत, बंजारा, ओबीसी, धनगर समाजाचे धर्मगुरू आहेत. महानुभवपंथांचे धर्मगुरू आहेत. वारकरी संप्रदायाचे आहेत सर्व येणार आहेत. त्या सर्वांनी यावं म्हणून आम्ही तीन चार दिवसाचा गॅप ठेवला आहे. आज आमचं ओरिजिनल शिक्कामोर्तब झालंय. मराठा, दलित मुस्लिम एकत्र आला. जागा किती लढायच्या याची घोषणा ३ तारखेला करणार आहे. उमेदवार कोण हे जाहीर करणार आहोत. आम्ही उमेदवाराबाबत काही लावून धरणार नाही.

महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली; बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा