चंद्रशेखर भांगे, पुणे
बारामतीत एका आठवड्यात महिला अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यातील एका घटनेत तर एका मुलीच्या वडिलांची हत्या सुद्धा झाली. या तीन ही घटनांमध्ये पोलिसांनी कडक कारवाई देखील केली पण प्रश्न निर्माण होतोय या गुन्हेगारांना एवढा माज येतोय तरी कुठून.
घटना क्रं 1
बारामतीत शहरातील खंडोबानगर या भागात महिलांनी एका वराह पालन करणारा व्यक्ती खूप अस्वछता करतात. कुजलेल अन्न प्राण्यांना खायला घालतात त्यामुळेच दुर्गंधी होतेय अशी तक्रार बारामती नगरपालिकेला केली. याचा राग मनात धरून दहा बारा जणांच्या टोळक्याने महिलांना भर वस्तीत बेदम मारहाण केली.
घटना क्रमांक 2
मुलीच्या छेडछाड प्रकरणावरून एका वडिलांनी मुलांना जाब विचारला. त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली म्हणून. तीन अल्पवयीन मुलांनी त्या मुलीच्या वडिलांची भर रस्त्यात धारदार हत्यारांनी वार करून हत्या केली.
घटना क्रमांक 3
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे या गावात एका सावकाराने पैशाच्या वसुलीसाठी एका गरीब कुटुंबातील महिलेला घरात घुसून विनयभंग तर केलाच. पण महादेवाची शप्पथ घेऊन पिडीत कुटुंबाचे अस्तित्व गावातून संपवण्याचा विडा उचलला.
या तीन ही घटनांमध्ये पोलिसांनी कडक कारवाई केली. आरोपींना अटकही केली पण या आरोपीचं बळ वाढतंय तरी कसं. हा प्रश्न निर्माण होतोय. अजितदादा हे अत्यंत कडक शिस्तीचे नेते. त्यांच्या शिस्तीची दहशत आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग दादा हे गुन्हेगारीची पीक का वाढतंय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर नीट लक्ष दया. तुमचे स्थानिक बगलबच्चे तुमच्या नावाखाली या गुन्हेगारांना पाठीशी घालतात. पोलिसांना त्यांचं कामं करू देत नाहीत.