अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच कोणत्या वस्तूंवर दिलासा मिळणार आणि काय महागणार?
या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या काळात ऑनलाईन गेमिंग उद्योगाचा प्रभाव किती आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकतं. या सर्व बाबींवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान, सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. यासोबतच चित्रपट गृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ. आतापासून खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे.
तसेच कार (MUVs) वर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे,