काही दिवसांपासून भारतातील काही राज्यांमध्ये गरमीने (heat wave)कहर केला आहे. उष्णेतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतामधील दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान अशा विभिन्न राज्यांध्ये उष्णतेत वाढ झाली आहे. यावेळी हवामान विभागाने (imd)त्यांच्या अधिकतम तापमान हे 50 डिग्री सेल्सिअम होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान शास्त्राच्या दृष्टिकोनातून यावेळी 50 सेल्सिअस तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच मे महिन्यामध्ये अधिक उष्णता असल्याचेही सांगितले. पश्चिम राजस्थानमध्ये (Rajasthan) तापमान 50 सेल्सिअसवर जाण्याचा धोका आहे. तथापि कमाल तापमानाचा हा विक्रम नाही. कारण यापुर्वी तापमान 52.6 अंश सेल्सिअमवर गेले आहे.
हवामान विभागाने सांगितले की, हा गरमीचा महिना आहे. पण यावेळी वाढते उष्णतेचे वातावरणाने सर्वांना हैराण केले आहे. त्यातचं एक आनंदाची बातमी आहे की, यावेळी पाऊस लवकर होणार असल्याने थोडी परिस्थितीमध्ये बदलेल. तसेच मार्च महिन्यामध्ये काही ठिकाणी सरासरी 32 टक्के पाऊस होत आहे.
तसेच यूपीमध्ये तापमान हे 47.4 डिग्री सेल्सिअम इतके आहे. तर काही ठिकाणी 46 डिग्री सेल्सिअम इतका तापमानाचा पारा चढला आहे. तर उत्तर प्रदेशामध्ये (UP) प्रयागराज, लखनऊ आणि झांसी या ठिकाणी तापमान 46.8 डिग्री सेल्सिअम, 46.2 डिग्री सेल्सिअम, 45.1 डिग्री सेल्सिअम येवढे नोंदवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हरियाणामधील (Haryana) गुरूग्राम आणि मध्य प्रदेश मधील सतना तर उच्च तापमान 45.9 डिग्री सेल्सिअम आणि 45.3 डिग्री सेल्सिअम इतके नोंद करण्यात आले आहेत. , दिल्लीमधील (Delhi) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेधशाळेत कमाल तापमान ४६.४ डिग्री सेल्सियस, राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये ४६.४ डिग्री सेल्सियस, मध्यप्रदेशातील नौगांवमधील 46.2 डिग्री सेल्सियस कमाल तापमान आहे.