Devendra Fadnavis 
ताज्या बातम्या

"येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होतील"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Dhule Speech : अक्कलपाडा धरणाचं ४० वर्ष लटकलेलं काम आपण पूर्ण केलं. १७० कोटी रुपये दिले. जन्मात जी योजना झाली नसती, पण मोदींनी सुळवाडे-जामफळ योजनेला २७०० कोटी रुपये दिले. हा जिल्हा आता सुजलाम सुफलाम होत आहे. आता तापी-बुराई योजनेसाठी ८०० कोटी रुपये दिले आहेत. त्याचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. मोदींच्या नेतृत्वात पश्चिमी वाहिन्यांचं काम पूर्वेकडे आणण्यात येणार आहे. येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होतील. धुळ्यात सुभाष भामरेंनी पाठपुरावा केला. त्यामुळे रेल्वेची आणि कॉरीडोअरची कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत. सहा राष्ट्रीय महामार्ग आल्यानं धुळे जिल्हा मध्यवर्ती आला आहे. मोदींमुळे धुळ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे, असं मोठं विधान देवेंद्र फडणीसांनी केलं आहे. ते धुळ्यात सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, आपल्या सर्वांना कल्पना आहे, ही निवडणूक महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची नाही. देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. लोकसभेत आपण ज्यांना निवडून पाठवतो, ते आपल्या देशाचा नेता निवडतात. कोणाच्या हातात आपला देश सुरक्षित राहिल, देशाचा विकास कोण करेल, सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल, अशा नेत्याला निवडण्यासाठी आपण या निवडणुकीत एकत्र आलो आहोत. एकीकडे महाभारतासारखी अवस्था आहे. एकीकडे पांडवांची सेना आहे. दुसरीकडे कौरवांची सेना आहे. पांडवांसोबत राजे आहेत. कौरवांसोबत काही राजवाडे आहेत. अशा परिस्थितीत येत्या २० तारखेला देशाच्या निवडणुकीचा फैसला करायचा आहे.

एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, मोदींच्या समवेत महायुतीतील सर्व घटकपक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींसोबत ३० ते ४० पक्ष एकत्र आले आहेत. आमच्याकडे प्रधानमंत्री मोदी आहेत. त्यांना विचारलं, तुमचे कोण आहेत ते सांगा, ते उत्तर देऊ शकत नाही. ते म्हणतात, आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री करू. मी म्हटलं ठीक आहे. पाच प्रधानमंत्री कराल, पण पहिला कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं, हे लोक संगीत खूर्चीचा खेळ करतील. सर्व पक्ष त्या खूर्चीजवळ फिरतील. जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री. जो दुसरा बसला, तो दुसरा प्रधानमंत्री. हा घंटा खूर्चीचा खेळ नाही. या देशाच्या भाग्याचा फैसला करायचा आहे. तुमच्या खासगी उद्योगाचा फैसला नाही. ज्या मोदींनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन केलं, त्या मोदींना निवडून द्यायचं आहे.

Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News