अमोल धर्माधिकारी,पुणे
पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र येथे महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी करण्यात येणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.