ताज्या बातम्या

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. शिवसेनेने आपल्या हक्काच्या मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्याकरिता कार्यकर्त्यांना सज्ज राहायला सांगितले आहे. या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंधेरी परिसरातील मरोळ-मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यात चार अपक्ष आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी साधारण १ हजार ६०० कर्मचारी कार्यरत असतील. या मतदान केंद्रावर एकूण १,४१८ मतदार असून त्यापैकी ७२६ मतदार महिला आहेत, तर ६९२ मतदार पुरुष आहेत. महिला मतदार जास्त असल्यामुळे हे केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले असून हे केंद्र विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे.

या मतदारसंघात एकूण अडीच लाखांहून अधिक मतदार असून २५६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पोटनिवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांमध्येही निरुत्साह जाणवतो. तरीही आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाकरिता बाहेर यावे, असे आवाहन केले आहे, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News Updates live: पुण्यातील तब्बल 259 उमेदवारांचे डिपॉझिट विधानसभा निवडणुकीत जप्त

मुंबईतील 'या' भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या

मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हवेची गुणवत्ता खालावली

मुख्यमंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा