वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू असतानाही विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. मात्र आता आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि कार्यक्रम होत असतात. यावेळी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे.