ताज्या बातम्या

काँग्रेसच्या स्नेहभोजनात विशाल पाटील यांची उपस्थिती; उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकी प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं. या स्नेहभोजन सोहळ्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थिती लावली होती.

विशाल पाटील, आणि विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रहार पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

विशाल पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सांगलीत काँग्रेसचा पाठिंबा नक्की कुणाला होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा