यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत तुफान चर्चा सुरु आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या कर्णधार असेल, असं फ्रॅंचायजीने आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं. अशातच आता मुंबई इंडियन्सला विजयाचा सूर गवसलेला नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सलग तीन सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई इंडियन्स खालच्या स्थानावर आहे. त्यामुळे हार्दिक पंड्यावर संघ व्यवस्थापनाकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबईचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचे माजी फलंदाज मनोज टावरीने म्हटलं होतं की, पुढील सामन्यापासून पंड्याला मुंबईचं नेतृत्व देण्याची शक्यता कमी आहे. यावर वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
त्यांनी जे म्हटलं आहे, ते योग्य आहे. पण थोड्या लवकर याबाबत माहिती दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सला नेहमीच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीनवेळा नाही, तर चार-पाच सामन्यांध्येही त्यांचा पराभव झाला आहे. त्यांना काही वेळ धीर ठेवावा लागेल. दोन-तीन फ्रँचायजी आहेत, ज्यामध्ये पंजाब, चेन्नईचा समावेश आहे.
जडेजा चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करत होता. त्यानंतर एम एस धोनीला पुन्हा कर्णधारपद देण्यात आलं. तसंच मुरली विजय आणि डेव्हिड वॉर्नरसोबतही असं घडलं होतं. सात सामन्यांनंतर अशी परिस्थिती झाली होती. पण ३ सामन्यानंतर कर्णधार बदलणे कदाचित संघासाठी योग्य निर्णय नसेल. पण ७ सामन्यानंतर असं होण्याची दाट शक्यता आहे.