ताज्या बातम्या

Vinod Tawde | एक हैं तो सेफ़ हैं, राहुल गांधी फेक है; विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर आरोप; विनोद तावडे यांचा प्रत्युत्तर, काँग्रेसच्या काळात अदानींचा विकास, धारावीकरांसाठी घरांच्या वचनाची घोषणा.

Published by : shweta walge

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (18 नोव्हेबर) पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक तिजोरीच आणली. या तिजोरीमधून नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे एक पोस्टर काढण्यात आले. एक हैं तो सेफ हैं म्हणत राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. मोदीजींनी तो नारा दिला आम्ही समजावला असेही राहुल गांधी यांनी म्हटले. यावरुनच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, आज सकाळी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. ८ नेते मंचावर होते, २ राज्यातील आणि ६ बाहेरचे होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक सेफ काढली. एक है तो सेफ है त्यातून अदानी आणि मोदीजींचे फोटो काढले. असे फोटो काढायचेच असतील तर अदानी आणि वाड्रा यांचे देखील आहेत, असं म्हणत विनोद तावडे यांनी फोटो दाखवले आहेत.

पुढे ते म्हणाले की, आम्ही देखील अदानी आणि काँग्रेसचं नातं कसं जुनं आहे. २०१४ आधी अदानींच्या वाढ झाली. गुजरातमध्ये चिमणभाईंनी पोर्ट दिला. राजीव गांधींच्या काळात माझी ग्रोथ झाली असं अदानी स्वत:चं म्हणाले आहेत. अदानींचा सर्वात जास्त विकास झाला तो कांग्रेसच्या काळात सरकारची कशी मदत झाली. २०१४ आधीचे आणि नंतरचे प्रोजेक्टची लिस्ट आहे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

तसच ते म्हणाले की, जे लोक धारावीत राहतात त्या सर्वांना घरं मिळणार आहे. धारावीत जे राहतात अधिकृत नाही त्यांना देखील घरं मिळणार आहे. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टी देखील मिळणार आहे. ५०० चौ. फुटाचा कार्पेट असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचं आहे. शेख यांना ते कंत्राट मिळालं नाही म्हणून चिंता आहे का? एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचं का?, असं हल्लाबोल विनोद तावडे यांनी केला आहे.

Gold Rate Decrese | सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोन्याच्या भावात 15 दिवसात 5500 रुपयांची कमी

Manipur | मणिपूरमध्ये 'एनडीए'त मोठी फूट; 'एनपीपी'चा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय | Marathi news

Uddhav Thackarey: अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

GST Taxpayers News | करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ

Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक