लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 24 एप्रिलला रत्नागिरी दौरा आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रत्नागिरीला येत आहेत. याचाच अर्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण मी अजूनही सांगू इच्छितो मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा मागच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्यासुद्धा 2 सभा कणकवली आणि रत्नागिरीला झाल्या होत्या. त्यावेळेलासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊनसुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता.
तसेच विनायक राऊत पुढे म्हणाले की, यावेळेला अमित शाह जरी आले तरी आमचा कोकण म्हणजे बाळासाहेबांचा कोकण, उद्धवजी ठाकरेंचा कोकण त्याच्यामध्ये कुणीही दुरावा निर्माण करु शकणार नाही. असे विनायक राऊत म्हणाले.