लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आमदार रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ही मुघलनीती ही पुन्हा एकदा अशी पद्धतीने चालू झालेली आहे. गद्दारांना फोडायचे आणि निष्ठावतांच्या अंगावर सोडायचे. पण गद्दारांना गाडणारी ताकद आजही मुंबईमध्ये आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, रविंद्र वायकर उभे राहू दे किंवा आणखी कोणी उभे राहु दे. तिथे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अमोल किर्तीकरच निवडून येणार. त्यामुळे गद्दारांनी अशा पद्धतीने लाचारी करायचे सोडा. निदान अस्तित्वासाठी तरी जिवंत राहा. असे विनायक राऊत म्हणाले.