ताज्या बातम्या

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; विजय वडेट्टीवार व्हिडिओ ट्विट करत म्हणाले...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

व्हिडिओ ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून घोषणा दिल्या. या विरोधात आज विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन केले.

यासोबतच ते म्हणाले की, घाबरले रे घाबरले भाजप वाले घाबरले, मनुवाद हटाओ संविधान बचाओ अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेतील भाषण नंतर खोटं नेरेटीव्ह सेट करण्यात आले त्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निदर्शने केली. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश