ताज्या बातम्या

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; विजय वडेट्टीवार व्हिडिओ ट्विट करत म्हणाले...

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळाले.

विरोधकांच्या आंदोलनाआधी सत्ताधाऱ्यांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत होते. विरोधकांनी यावेळी हातात गाजर, फलक घेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे.

यावर आता विजय वडेट्टीवार यांनी पायऱ्यांवरील आंदोलनाचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, महाविकास आघाडीची विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार निदर्शने.तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असा महायुतीचा आजचा एकूण कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत धसका घेतल्याने, विधानसभेला मस्का लावून मतदारांना ठगण्यासाठी अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश