ताज्या बातम्या

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; विजय वडेट्टीवार व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. विरोधकांच्या आंदोलनाआधी सत्ताधाऱ्यांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत होते.

विधान भवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी - विरोधक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून पायऱ्यावर आंदोलन सुरु केल्यानंतर सत्ताधारी विधानभवनात निघून गेलं. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. हातात गाजर घेत विरोधकांकडून आंदोलन करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत वर बघा कर्ज, खाली बघा कर्ज, इकडे बघा कर्ज, तिकडे बघा कर्ज! महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर फक्त कर्ज आणि कर्ज असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश