Vijay Wadettiwar Google
ताज्या बातम्या

विजय वडेट्टीवारांचं महायुती सरकारवर शरसंधान; ट्वीटरवर म्हणाले, "एक हजार कोटींचे सहा राष्ट्रीय महामार्ग..."

Published by : Naresh Shende

Vijay Wadettiwar Tweet : राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्याच पावसात एक हजार कोटींचे सहा राष्ट्रीय महामार्ग आणि ५० हून अधिक राज्य व अतंर्गत रस्ते उखडले आहेत, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, असं ट्वीट करत वडेट्टीवारांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे.

विजय वडेट्टीवार ट्वीटरवर काय म्हणाले?

महायुती सरकारने विकासाचा कितीही फेक नरेटिव्ह तयार केला तरी अदृश्य शक्ती यांची पोलखोल केल्या शिवाय राहत नाही. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्याच पावसात एक हजार कोटींचे सहा राष्ट्रीय महामार्ग व ५० हून अधिक राज्य व अंतर्गत रस्ते उखडले गेले आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

भ्रष्टाचार व निकृष्ट बांधकामामुळे शेकडो कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. योजना आणि विकासकामांचे श्रेय घेण्यात चढाओढ करणारे आता विकासाच्या या फेक मॉडेल मॉडेलचे आणि पहिल्याच पावसात उघडलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News