राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
या घटनेत आता मृतांचा आकडा 14वर पोहचला असून 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 74 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, घाटकोपर इथे अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हे होर्डींग नियमात बसते का? अनधिकृत असेल तर ज्या जाहिरात कंपनीचे होर्डिंग होते त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत आणि सहाय्यता सरकारने उपलब्ध करून द्यावी ही सरकारकडे मागणी आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.