ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : नीट परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे

Published by : Siddhi Naringrekar

नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे. विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, नीट परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. नीट परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी दोन - तीन वर्षे तयारी करीत असतात त्यांचे आयुष्य या घोटाळ्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, घोटाळ्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नुकसान होईल त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. नीट झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी मा.श्री. मल्लिकार्जुन खरगे, प्रियंकाजी गांधी यांनी केली आहे.

राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ही परीक्षा रद्द करण्याचा मागणी करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार