ताज्या बातम्या

गुंजवणी सिंचन प्रकलपाबाबत विजय शिवतारे यांचे आमदार संजय जगताप यांच्यावर आरोप

Published by : shweta walge

पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला गुंजवणी सिंचन प्रकल्प हा नेहमीच विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे.आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर आमदार संजय जगताप आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून परस्परविरोधी दावे केले जातायत. गुंजवणी प्रकल्प जोपर्यंत मूळ योजनेनुसार होत नाही तोपर्यंत या योजनेच काम करू देणार नाही असा पवित्र आमदार संजय जगताप यांनी घेतला होता.

मात्र आज नीरा येथे माजी मंत्री विजय शिवतरे यांनी मूळ प्रकल्पात बदल हा आमदार संजय जगताप यांनीच केल्याचा आरोप केलाय. 21 जुलै 2020 रोजी या योजनेत बदल केल्याचा दावा त्यांनी केलाय.तर या संदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकारातून आपण मिळवली असून लवकरच लोकांसमोर मांडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलय.तर यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.शिवतारे हे आज नीरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केलाय.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल