बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी बारामतीमधून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. बारामती मतदारसंघ कोणाची मालकी नाही. बारामतीवर कुणाची मालकी नाही.
बारामती हा देशातील 543 पैकी एक मतदारसंघ. माझ्याविरोधात जाऊन अजितदादांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. कुणाला तरी पाडायची ही कसली वृत्ती? अजितदादा कुणाशीही नीट बोलत नाहीत. तू कसा निवडून येतो असे अजितदादा म्हणाले. अजित पवार अतिशय उर्मट. आज सुळे आणि सुनेत्रा पवारांना लोक मतं देऊ इच्छित नाहीत. पुरंदरचे लोक म्हणतात आम्हाला बदला घ्यायचा आहे. बारामतीची निवडणूक लढणार म्हणजे लढणार. अजित पवार यांना वाटतं ते पुण्याचे मालक. जनतेला देखील अजित पवार यांचे वागणं आवडत नाही.
बारामतीची जागा मी अपक्ष म्हणून लढवणार. पवारांनी पुरंदराला कोणता प्रकल्प दिला. पवार कुटुंबियांचे राजकारण म्हणजे घराणेशाही. लोक म्हणाले आता माघार घ्यायची नाही. ही लढाई खासदार होण्यासाठी नाही. मी महायुतीविरोधात नाही. कुणीतरी हिंमत केलीच पाहिजे. आम्ही जनतेच्या आशिर्वादाने नक्कीच निवडून येऊ. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही लढाई. मी काही बंड केलं नाही ही न्यायाची लढाई.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र थांबलं पाहिजे. ही लढाई विजय शिवतारे यांची नाही. ही प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांना गुरू मानणारा माणूस मी आहे. इथली लढाई वेगळी आहे. लोकांचा आदर करून मी लढणार आहे. विजय शिवतारे खासदार झाला तर सर्वसामान्य माणूस खासदार होणार आहे. गावागावातील लोक म्हणतात अजित पवार जिंकू शकत नाहीत. 2024ची निवडणूक सर्वच स्वतंत्र लढतील. अजितदादा स्वत:च्या स्वार्थासाठी महायुतीत आलं. अजित पवार भाजपकडे आले म्हणजे स्वच्छ झाले असे नाही. माझी लढत अजित पवारांशी नाही. माझी लढत सुप्रिया सुळेंशी. असे विजय शिवतारे म्हणाले.