Vijay Shivtare On Ajit Pawar 
ताज्या बातम्या

बंडामुळे बारामतीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळणार? विजय शिवतारेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "पवारांविरोधात..."

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मदतार संघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गट आणि शरद पवार गटाची राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत होणार, असं बोललं जातय. परंतु, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने महायुतीची डोकेदुखी वाढलीय. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबावर टीकेची झोड उठवणाऱ्या शिवतारे यांनी निवडणूक लढवणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, पवारांविरोधात ५ लाख ८० हजार मतदार आहेत. त्यांना संधी मिळाली पाहिजे ना? सुप्रियाताई आणि सुनेत्राताई यांना आम्ही मत देऊ इच्छित नाही. ४० वर्ष आम्ही पवारांनाच का मते द्यायची. २०१४ ला मी प्रयत्न केला. २०१९ मध्येही मी प्रयत्न केला. जानकरांच्यावेळी मला तिकीट दिली असती, तर त्यावेळी मी निवडून आलो असतो. देशातल्या ५४३ लोकसभा मतदारसंघापैकी बारामती लोकसभा मतदार संघ एक आहे. हा कुणाचा सातबारा नाहीय. बारामतीतला आणखी कुणीतरी उमेदवार पाहिजे ना...फक्त पवार कुटुंबियच का? बारामतीचाच का, इंदापूरचा का नको? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मोदी साहेबांनी या घराणेशाहीविरोधात लढाई सुरु केली आहे. त्यातला एक छोटासा भाग म्हणून आम्ही काम करतोय. ४१ वर्ष मी त्यांना मतं देतोय. त्यामोबदल्यात आम्हाला मिळालय काय? नमो रोजगार मेळाव्यात दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येतील म्हणून दोन बुके घेऊन गेलो होतो. परंतु, एवढा गर्व मी कुठेच पाहिला नाही. भाजपवर प्रेम करणारे लाखो, करोडो लोक आहेत, असंही शिवतारे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी