Vijay Chaudhary Team Lokshahi
ताज्या बातम्या

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा पंजाबच्या हिंदकेसरीला धोबीपछाड

पंजाबच्या हिंद केसरीचा पराभव करत विजय चौधरींनी पटकावला कन्हैया केसरीचा बहुमान

Published by : Sudhir Kakde

चाळीसगाव | मंगेश जोशी : चाळीसगाव तालुक्यातल्या सायगाव येथील मूळ रहिवासी असलेले व 2014 ते 2016 असे सलग तील वर्ष मानाची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) गदा पटवणारे मल्ल विजय चौधरी यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथे झालेल्या कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेत पंजाब मधील हिंद केसरी (Hind Kesari) मल्ल अजमेर सिंग यांना पराभूत करून विजय चौधरी (Vijay Chaudhary) हे कन्हैया केसरीचे (Kanhaiya Kesari) मानकरी ठरले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे युवा उद्योजक व मच्छिंद्र लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेत विजय चौधरी यांनी हा बहुमान पटकावला असून विजय चौधरी यांना कन्हैया केसरी ची चांदीची गदा व तीन लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेत राज्यासह इतर राज्यातून नामांकित मल्ल कुस्तीच्या आखाड्यात उतरले होते यात विजय चौधरी व अजमेर सिंह यांची कुस्ती लक्षवेधी ठरली. विजय चौधरी हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील असल्याने त्यांच्या या विजयाने चाळीसगावचे नाव पुन्हा कुस्ती पटावर झळकले आहे.

विजय चौधरी यांनी सायगाव येथूनच शालेय जीवनापासून कुस्तीचा सराव केला असून 2008 मध्ये पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये हिंद केसरी रोहित पटेल व प्रसिद्ध मल्ल अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनात कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून विजय चौधरी यांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरून अनेक प्रसिद्ध व नामांकित मल्लांसोबत खेळत अनेकांचे लक्ष वेधले. तर 2014 ते 2016 या कालावधीत सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवत मानाची महाराष्ट्र केसरीची गदा विजय चौधरी यांनी पटकावली. विजय चौधरी यांच्या या कामगिरीची दखल घेत 2017 साली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विजय चौधरी यांना महाराष्ट्र पोलीस दलात विशेष नियुक्ती देऊन महाराष्ट्र सरकारकडून सन्मानित करण्यात आले.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result