mahavikas aghadi vs bjp Team Lokshahi
ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election Live : भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजयी गुलाल

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

कॉंग्रेस : भाई जगताप (20) आणि चंद्रकांत हंडोरे (26)

भाजप : प्रवीण दरेकर (26), राम शिंदे (26), श्रीकांत भारती (26), उमा खापरे (26), प्रसाद लाड (26)

राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे (27), रामराजे निंबाळकर (26)

शिवसेना : सचिन अहिर (26) आणि आमशा पाडवी (26)

भाजपचे पाचही उमेदवार विजयी. कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी तर भाई जगताप यांचा पराभव.

कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी. 

शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी. तसेच भाजपचे श्रीकांत भारती, उमा खापरे विजयी, प्रविण दरेकर. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे निंबाळकर विजयी.

भाजपचे राम शिंदे 26 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसे 27 मतांनी विजयी

दोन मते बाद झाल्याने पहिल्या पसंतीचा कोटा बदलला. 25.71 नवा कोटा आहे.

मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली असून दोन मतपत्रिका बाजूला काढल्या आहेत. राष्ट्रवादीनंतर भाजपचेही एक मत बाद झाले असून उमा खापरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

महाविकास आघाडीचे एक मत बाद झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाले आहे. यावर निवडणुक आयोगच्या निर्णयाची प्रतिक्षा केली जात आहे. तर मत बाद झाल्यामुळे आता वाद सुरु झाले आहेत.

आम्हाला विजयाची खात्री आहे. जनताच भाजपला उत्तर देईल : नाना पटोले 

सर्व 285 मतदारांची मते वैध ठरली आहेत

निकालाआधीच सचिन अहिर समर्थकांचा जल्लोष सुरु. तर एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून मुक्ताईनगरमध्ये टरबूज फोडून जल्लोष

2 तासानंतर अखेर मतमोजणीला सुरुवात

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानवर आक्षेप घेतला आहे. मात्र, निवडणुक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला.

एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी मुंबईत दाखल होत, जल्लोषाला सुरुवात केली आहे. नाथाभाऊंचा विजय होणार हा विश्वास आम्हाला असून, शरद पवारांनीच त्यांना न्याय दिल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. 

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता या निकालाला सुद्धा उशीर होणार का असा सवाल निर्माण होतोय. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली. मात्र पसंतीची मतं देताना दुसऱ्याची मदत घेतली असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

सर्व आमदारांचे मतदान पूर्ण; 5 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

दुपारी 2 वाजेपर्यंतचे एकूण 275 आमदारांचं मतदान पूर्ण, केवळ 10 आमदारांचं मतदान बाकी

नाना पटोले - काँग्रेसच्या सर्व आमदारांचं मतदान झालं, मविआच्या मतांचं समीकरण करुन ही निवडणूक लढली, निकाल महाविकास आघाडीच्या बाजुनेच येतील, काँग्रेसमध्ये आनंदच आनंद, अग्निवीरांमध्ये नाराजी, आमचा कोटा ठरवूनच आम्ही सगळं केलं आहे, कोटा बरोबर आहे, त्याचा सहाव्या उमेदवाराला फायदा होईल

अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसेंमध्ये बैठक, अजित पवारांच्या दालनात बैठक

काँग्रेसच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण, तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचं मतदान बाकी

विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी १ वाजेपर्यंतचे एकूण २४६ आमदारांचं मतदान, अद्याप ३९ आमदारांचं मतदान बाकी

आमदार रवि राणा विधानभवनात दाखल

हातात हनुमान चालीसा घेऊन राणा विधानभवनात दाखल

भाजपचे सर्व आमदार विजयी होणार - रवी राणा

माझ्यावर दबाव टाकण्यासाठी वॉरंट - रवी राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनिती आखली. प्लॅनिंगनुसार ५ आमदारांचा ग्रुप विधिमंडळात मतदान करण्यासाठी येतो आहे. स्वत: आदित्य ठाकरे प्रत्येक आमदारावर जातीने लक्ष ठेवून आहेत.

देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण, सुधीर मुनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप यांचं मतदान बाकी

नॉट रिचेबल अण्णा बनसोडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

शिवसेनेकडून आमदार महेंद्र दळवींनी पहिलं मतदान केलं

विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव, मलिक आणि देशमुखांचा सर्वोच्च न्यायालयात मतदानाच्या परवानगीसाठी अर्ज, न्यायालयाच्या निर्णय राष्ट्रवादीचा महत्त्वाचा ठरणार

शिवसेना आमदारांच्या मतदानाला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मतदानासाठी ५ गट ठरवले, सेना आमदार पाच गटात मतदान करणार 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदान सुरू आहे, आघाडी सरकारचे सर्व आमदार मतदान करणार आहेत. कोणीही नाराज नाहीत, नॉट रीचेबल नाहीत, छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण. 

राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, धनंजय मुंड, निलेश लंके, दिलीप मोहिते, अशोक पवार, अण्णा बनसोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचं मतदान पूर्ण

सकाळी 10 वाजेपर्यंत ६८ आमदारांनी नोंदवली मतं

देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन, मतदान लवकर पूर्ण करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी, मतदान शांततेने आणि लक्षपूर्वक करण्याच्या आमदारांना सूचना

भाजपाचे सर्व आमदार विधानभवनातील पक्ष कार्यालयात दाखल

मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या १५ मिनिटांत १५ आमदारांनी आपली मते नोंदवली आहेत. हरिभाऊ बागडे यांनी सर्वात आधी मतदान केलं आहे.तर आत्तापर्यंत भाजपाच्या आठ आमदारांनी मतदान केलं आहे. अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर हे काँग्रेसचे पोलिंग एजंट आहे.

संजय कुटे, अतुल भातखळकर आणि आशिष शेलार हे भाजपचे पोलिंग एजंट

आदित्य ठाकरेंसह सेना आमदारांची बस ट्राफिकमध्ये अडकली

शिवसेना आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका

आमचं विजय निश्चित, महा विकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येतील.  निकालानंतर गुलाल उधळण्यासाठी आम्ही सज्ज झालेले आहोत - मंत्री विजय वडेट्टीवार 

भाजपचा विजय होईल,  पराभव महाविकास आघाडीचा होईल - व्ही के पाटील

एकनाथ खडसे विधानभवनाकडे रवाना

शिवसेनेच्या आमदारांची बस विधानभवनाकडे रवाना

महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असं संख्याबळ मविआकडे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सहाही उमेदवार निवडून येतील - नाना पटोले

काँग्रेसचे आमदार फोर सीजन मधून बाहेर पडत आहेत, थोड्याच वेळात विधान भवनात कडे रवाना होतील.

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत दाखल

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज ( 20 जून) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे - भाजपा - राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड शिवसेना - आमश्या पाडवी, सचिन अहिर राष्ट्रवादी - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी