गुलाबचंद कटारिया 
ताज्या बातम्या

''रावणाने सीतेचं अपहरण करून काही गुन्हा केला नाही'', भाजपा आमदाराच्या वादग्रस्त विधानाचा VIDEO VIRAL

राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आतासुद्धा गुलाबचंद कटारिया यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

बोहेडा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, रावणाने सीतेचे अपहरण करुन कोणता मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता.

त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून उदयपूर जिल्ह्यातील वल्लभनगर विधानसभेचे माजी आमदार रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन ते म्हणाले की, कटारियाच्या मते रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. त्याने काही मोठा गुन्हा केला नाही.

सीतेचे अपहरण एक सामान्य विषय होता. जर रावणाने सितेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता. कटारियांच्या मते जर कुणाच्या पत्नीचे अपहरण करुन स्पर्श केला नाही तर तो गुन्हा नाहीय यासोबतच ते म्हणाले की, कटारिया ह रावणाचेच अनुयायी आहेत. यामुळेच भगवान राम, महाराणा प्रताप आणि आपल्या इतिहासाला शिव्या देत राहतात. व्यक्तिचे बोलणेच त्याचे चरित्र कसे आहे, हे दाखवते. आता आम्हाला समजायला लागले आहे की, ते हिंदू आणि मेवाडी नाही तर श्रीलंकेतून आले आहेत. त्यांना आदर्श पुरुष रावणाला भेटण्यासाठी तिकडे पाठवायला हवे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती