मुंबईत भाजीपाला महागला असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन भाज्यांचे दर वाढल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई एपीएमसीत भाज्याची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे.
भाज्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळत असून टोमॅटोची 1800 क्विंटल, फ्लॉवर 824 क्विंटल, शिमला मिरची 754 क्विंटल आणि हिरवा वाटाण्याची 180 क्विंटल आवक झाल्याची माहिती आहे.
यासोबतच टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवर शंभरीपार गेल्याचे पाहायला मिळत आहे. वाटाणा प्रतिकिलो 130 ते 140 रुपयांवर पोहचला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे.
गेल्या आठवड्यातील पावसाचा भाज्यांना फटका बसल्याचे पाहायला मिळत असून पावसामुळे भाज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या महागाईने मात्र सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.