लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. यातच आता पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर आल्याची माहिती मिळत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता वसंत मोरे यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले की, 'तरीपण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी' असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. वसंत मोरे हे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत.
त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर विरुद्ध वसंत मोरे असा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.