आज महाविकास आघाडीच्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, प्रथमता असं होतंय की लोकसभेच्या उमेदवारीसाठी फॉर्म भरायला चालली आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे. मला जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. काम करत असताना लोकांच्या अपेक्षासुद्धा माझ्याकडून खूप आहेत. मला या गोष्टीचा आनंद आहे की, सर्वसामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ते असतील हे सर्व खूश आहेत की, वर्षा गायकवाड या उमेदवार आहेत. याचे कारण म्हणजे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. लोकांना माहित आहे की काम करण्याचा अनुभव आहे. मागील माझा इतिहास पाहता लोकांना पूर्णपणे खात्री आहे की, ताई ही आपली ताई आहे आणि जे एक असतं ना की बोलताना, वागताना जी सहजता आहे.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, मी 9 महिने जवळपास बघितले तर मुंबई काँग्रेसचं अध्यक्षसुद्धा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी पूर्वीपासूनचे संबंध असल्यामुळे मला अपेक्षा आहे की, लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभेची निवडणूक आहे ही देशासाठी खूप महत्वपूर्ण निवडणूक आहे. येणारे इलेक्शन हे ऐतिहासिक इलेक्शन आहे. या देशाला वेगळी दिशा देणारं इलेक्शन आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी, संविधानासाठी आम्ही सगळं मैदानात उतरलो आहोत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राने कधीच गद्दारांना माफ केलेलं नाही. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, यावळेला सुद्धा जे आहे महाराष्ट्रामधल राजकारण झालं, महाराष्ट्रामध्ये जे दोन पक्ष तोडण्याचं काम झालं, सरकार फोडण्याचे काम झालं. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही. मुंबईच्या अस्मितेसाठी सातत्याने आम्ही भांडलेलो आहोत. मुंबईच्या प्रश्नावर आम्ही भांडलेलो आहोत. भाजपाने काय मुंबईला दिलं हासुद्धा प्रश्न 10 वर्षामध्ये आम्ही विचारणार आहोत. त्यामुळे अपेक्षा आहे की जनता मला आशीर्वाद देईल आणि निवडून देईल.
ज्या ज्या वेळेला मी निवडणूक लढते ही विचारांची लढाई आहे कुणाच्या वैयक्तिक लढाईचा प्रश्न नाही. विचाराच्या लढाईमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की, मी सर्वांना जोडून घेऊन जाणारा विचार, सर्वधर्मसमभाव मानणारा विचार, लोकशाही मानणारा विचार, संविधान मानणारा विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. वर्षा गायकवाड हे नाव यासाठी प्रसिद्ध आहे की, ताई काम करणारी आहे, ताई प्रश्नांची जाण ठेवणारी, ताई वेळेप्रसंगी भांडणारी आणि रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारी ताई आहे. त्यामुळे मला वाटतं हा एक माझा विचार आहे. दुसरीकडे हुकूमशाही, मनोवादीचा विचार आहे. शेवटी भाजपाची विचारसरणी काय हे मी सांगायची गरज नाही. भाजपाने राजकारणाची परिभाषा बदलली आहे. आता लहान मुलांना माहित पडलं आहे की ईडी काय आहे. ज्या लोकांना नोटीसा दिल्या जातात 2 दिवसाने त्यांनाच तुम्ही आपल्या पक्षामध्ये घेता. मला असं वाटतं की या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर एकता, अखंडता आणि एक विजय म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून मला अपेक्षा आहे की जनता यावेळी मला आशीर्वाद देईल.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मी भाई जगतापांना जाऊन भेटलेलं आहे. मला वाटतं नाही त्यांची काही नाराजगी असेल, नसीम भाईंना मी जाऊन भेटली. त्यांनासुद्धा मी विनंती केलेली आहे. मला वाटतं नाही की कुठलीही नाराजी आणि माझ्याबद्दल नाराजी का व्हावी? मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. सातत्याने तुम्ही जर बघाल तर मी निवडून येणारी कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांनी 2004मध्ये इलेक्शन लढलं होते त्यावेळेला माझ्या वडिलांनी उत्तर मध्य मुंबईमधून इलेक्शन लढलं होते. त्यावेळेला लोकांनी म्हटलं होते की, गायकवाड जिंकणार कसं पण तिथल्या जनतेनं निवडून दिलं. मला असं वाटतं की इतिहास पुन्हा एकदा होईल. वर्षा गायकवाडला जनता निवडून देईल. मी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या मतदारसंघामध्ये जाते मला लोक सांगतात आपली कार्यपद्धती, आपल्या वडिलांची कार्यपद्धती आम्हाला चांगली माहिती आहे. म्हणून आम्हाला जनसामान्यांचा नेता पाहिजे, आम्हाला सर्वसामान्यांबरोबर राहणारा कार्यकर्ता पाहिजे. वर्षा गायकवाड यांना नाराजी असण्याचे कारण काय? कोणताही नाराजी नाही. आमच्यामध्ये एकी आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या काळामध्ये काम करु.असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.