ताज्या बातम्या

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्षाकडून मंदिराच्या शिखराची तोडफोड

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माजी नगराध्यक्षाकडून मंदिराच्या शिखराची तोडफोड करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांकडून शिखराची तोडफोड करण्यात आली आहे.

त्यामुळे आता बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर पायथ्याला शिवलिंग होते. जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जायचे मात्र वैजनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने देशमुख यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे.

मंदिर संस्थानने बंद केलेल्या जागेची हातोड्याने तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने याप्रकरणी परळी शहर पोलीसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

वैद्यनाथ मंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या एका खिडकीसारख्या जागेत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून टाकण्यात आली. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी वैद्यनाथ मंदिराच्या शिखराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुलूप तोडून शिखरावर प्रवेश करत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून टाकली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

विधानसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; वैद्यकीय चाचणीतून आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न

पुण्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी