ताज्या बातम्या

वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार; पंकजा मुंडेंची जाहीर सभेत घोषणा

पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू होणार आहे. स्वतः पंकजा मुंडे यांनी ही माहिती जाहीर सभेतून दिली आहे. दुष्काळा दरम्यान आर्थिक संकटात हा कारखाना सापडला होता त्यामुळे हा कारखाना बंद होता.

मात्र आता वैद्यनाथ साखर कारखाना सुरू होणार असून अंबाजोगाईत महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी याबाबत माहिती दिली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, उसाची चिंता करायची नाही. 14 तारखेला वैद्यनाथ कारखान्याचे जे काही झालं तिथे कारवाई झाली. माझा चांगला चाललेला कारखाना बंद पडला. माझ्या कारखान्याला मदत नाही मिळाली. हे सगळं जगासमोर आहे. त्या कारखान्याचा विषय मार्गी लागला. मी नेहमी म्हणायचे कारखाना माझा राहूदे किंवा नाही पण कारखाना चालला पाहिजे. मला फक्त सामान्य माणसाचे हित करायचे आहे.

कुणीही चिंता करायची गरज नाही. 14 तारखेला रोलरचे पूजन आहे आणि 25 तारखेला मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे. परळी मतदारसंघ जेव्हा आमच्या भावाला आम्ही दिला. दुष्काळीच्या आर्थिक नुकसानीत कारखाना अडकला होता. आज कारखाना चालू होणार आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद