नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांवर केलेल्या टीकेवर आमदार वैभव नाईक प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील कॉम्प्लेक्स प्रकरणी कोणाच्या वडिलांना अटक होणार होती. आपला पक्ष कसा विसर्जित केला आणि भाजपमध्ये कसे गेले? याआधीचा राणेंचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारवाया झाल्यात. पण त्याला डगमगता ते सामोरे जात आहेत. मागील ४ वर्षे हेच दिशा सालीयान प्रकरणी आरोप करीत आहेत. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे अशा आरोपांना उध्दव ठाकरेंनी भीक घालणार नाहीत. खरे तर नितेश राणे यांनी आपल्या वडिलांना उमेदवारी मिळावी म्हणून अधिक लाचारी करावी आणि अधिकची स्टेटमेंट द्यावीत.
केसरकरांवर टीका करत म्हणाले की, केसरकर हे कोणत्या पक्षाचे आहेत ? भाजप की शिवसेनेचे. सध्या त्यांची वक्तव्ये ही भाजपच्या बाजूने होत आहेत. केसरकर बिन बुलाये मेहमान आहेत. ते आपल्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना एकदिवस विचारले पाहिजे की ते कोणाचें प्रवक्ते आहेत?