Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एका घराच्या उत्खननादरम्यान मजुरांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेले भांडे सापडल्याने खळबळ उडाली. ही नाणी मोठ्या प्रमाणात पाहून मजुरांनी आपापसात वाटून घेतली आणि तेथून पळ काढला. घरमालकाला याची माहिती मिळताच तो घटनास्थळी पोहोचला, तिथे त्याच्याकडे फक्त 10 नाणी होती. यानंतर याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी नाणी मालकाकडून ताब्यात घेतली. त्याचबरोबर फरार मजुरांचा शोध सुरू आहे.(uttar pradesh workers found several gold coins while excavation in jaunpur fleed away police investigating)
नेमकी घटना काय घडली
ही घटना जौनपूरच्या मच्छलीशहरच्या कजियाना परिसरातील आहे. येथे एका घरामध्ये नाल्याची टाकी बनवण्यासाठी उत्खनन सुरू होते. यादरम्यान मजुरांना खजिन्याने भरलेले भांडे मिळाले. हे पाहून मजुरांना आश्चर्य वाटले. यानंतर त्यांनी नाणी आपापसात वाटून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. कामगार निघून गेल्यानंतर घरमालकाला मातीच्या आतून सुमारे 10 नाणीही मिळाली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासासाठी पोहोचून जमीनमालकाकडून नाणी जप्त केली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नाणे घेऊन पळून गेलेल्या मजुरांची चौकशी केल्यानंतर पोलीस त्यांच्याकडूनही नाणी जप्त करणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मौन पाळले असले तरी एकही अधिकारी कॅमेरावर काहीही बोलायला तयार नाही.