आज केंद्रीय लोकसेवा आयोगानं सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा यूपीएससीची (UPSC) मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर पाहू शकतात. यंदा १५ ते २४ सप्टेंबर या कालावधीत युपीएससीची मुख्य परीक्षा पार पडली होती.
अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
होमपेज वर निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा वेबसाईट वर परीक्षा आणि त्याखाली निकालाच्या टॅब वर अंतिम निकाल पाहता येईल.
निकालावर क्लिक केल्यावर निकाल हा एका पीडीएफ फाईल मध्ये दिसेल जो डाऊनलोड देखील करता येऊ शकतो.
आता तुमचा रोल नंबर त्यामध्ये शोधा आणि तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र झालात का? हे तपासा.
इथे थेट पहा तुमचा निकाल
युपीएससीनं २८ उमेदवारांचा निकाल कोर्टानं प्रलंबित प्रकरणांमुळं रोखून ठेवले होते. मात्र आता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत पर्सनल इन्टरव्हूनतंर आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहेत. हे निकाल ३० दिवसांसाठी वेबसाईटवर उपलब्ध राहतील.