Covid19 Team Lokshahi
ताज्या बातम्या

Covid 19 : उत्तर प्रदेशात पुन्हा संसर्ग वाढला; सात जिल्ह्यांत मास्क सक्ती

दिल्लीच्या काही भागात सुद्धा कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतेय.

Published by : Sudhir Kakde

Covid 19 Uttar Pradesh : उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी राजधानी लखनऊ (Lucknow Covid19) आणि परिसरातील सात जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने दिल्ली (NCR) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांवर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासांत गौतम बुद्ध नगरमध्ये 65, गाझियाबादमध्ये 20 आणि लखनऊमध्ये 10 नवीन कोरोना (Corona Virus) बाधित आढळले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच मास्क घालण्याबद्दल सूट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अनेक जिल्ह्यांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी लोकांना मास्क वापरण्यापासून सूट दिली आहे. त्यानंतर दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली असून संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे.

दरम्यान, रविवारी दिल्लीत कोविड-19 चे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्गाचा दर 4.21 टक्के एवढा झाला आहे. रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,68,550 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर संसर्गामुळे आतापर्यंत 26,160 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी, राष्ट्रीय राजधानीत कोविड -19 चे 461 नवीन रुग्ण आढळले असून, दोन लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी