रक्षाबंधन सणाची धामधूम सुरू झाली आहे. सध्याचं जग हे डिजिटल आहे. यामुळेच ओवाळणी म्हणून देणारी भेटवस्तू किंवा पैसे देखील डिजिटल पद्धतीने देण्यात येत आहे. काही भाऊ आपल्या बहिणीला ऑनलाईन गिफ्ट मागवतात, किंवा मग मोबाईल स्कॅनरच्या मदतीने तिला पैसे देतात. मात्र, एका बहिणीने गिफ्ट घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. तिथे मेहेंदीद्वारे एका महिलेच्या हातावर क्यूआर कोड रंगवला जात असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. राखी सणासाठी ही एकप्रकारची मेहंदी डिझाइन तयार केली गेली आहे, जी भावंडांमधील भेटवस्तूंच्या पारंपरिक देवाणघेवाणीला डिजिटल ट्विस्ट देते.
सोशल मीडियावर ही ट्रिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. या व्हिडिओला अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर सुमारे 74 हजार इन्स्टाग्राम यूजर्सनी याला लाईक केलं आहे. यावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्सनी या व्हिडिओच्या सत्यतेवर शंका व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र बाकी यूजर्स या व्हिडिओचं कौतुक करताना दिसत आहेत.