Nitin Gadkari 
ताज्या बातम्या

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, "देशात पैशांची कमतरता..."

Published by : Naresh Shende

Nitin Gadkari Chandigarh Speech : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत मोठं विधान केलं आहे. चंदीगडमध्ये जनतेला संबोधीत करताना गडकरी म्हणाले, "मी असं सांगणारा मंत्री आहे की, या देशात पैशांची कमी नाही. या देशाता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे. १९९५-२००० मध्ये मला चांगला अनुभव मिळाला. मी महाराष्ट्रात मुंबईत मंत्री होतो. तुम्ही मुंबईला गेल्यावर समुद्रात वरळी-वांद्रे सी लिंक पाहायला मिळेल. ते बनवण्याचं भाग्य मला लाभलं."

गडकरी पुढे म्हणाले, मुंबई-पुणे देशातील पहिला एक्स्प्रेस हायवे मी बनवला. तेव्हा माझ्याकडे ५ कोटी रुपये होते. त्यावेळी धीरुभाई होते आणि रिलायन्सचं टेंडर मी नाकारलं होतं. त्यावेळी रिलायन्सच्या टेंडरची किंमत ३६०० कोटींचं होतं आणि आज त्याची किंमत ४० हजार कोटी रुपये आहे. त्यांनी सर्वात कमी किंमत दिली म्हणून लोकांनी माझ्यावर टीका केली.

मला सांगायला आनंद झाला की, आम्ही कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. एमएसआरडीसीसारखी संस्था निर्माण केली. आम्ही बाजारातून पैसे उभे केले. आम्ही बाजारात पहिल्यांदा ६५० कोटींसाठी गेलो तेव्हा आम्हाला १२५० कोटी रुपये मिळाले. त्या अनुभवाने मला शिकवलं की देशात पैशांची कमी नाही.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा