आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे.