केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर देखिल भर देण्यात आला आहे. निर्मला सीतारामण यांनी घोषण्या केल्या की, आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार आहेत. तर आदिवासींसाठी 15 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. तर एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी 157 नवीन महाविद्यालये बांधण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असल्याचे अर्थसंकल्पात सांगितले आहे.
यासोबतच देशात पंतप्रधान कौशल्य विकास योजना ४.० सुरु करण्यात येणार आहे. युवकांना आंतरराष्ट्रीय संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून ३० स्किल इंडिया नॅशनल सेक्टर्सची उभारणी केली जाणार आहेत. देशभरात आगामी तीन वर्षांमध्ये केंद्रीय संस्थांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. केंद्र सरकार ३८ ८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ७४० एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.