Plastic Pollution Team Lokshahi
ताज्या बातम्या

Plastic Pollution : 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल, संयुक्त राष्ट्राने दिला मोठा इशारा

Published by : Siddhi Naringrekar

आजच्या काळात संपूर्ण जग आधुनिकतेच्या प्रभावाखाली जात आहे. जगभरात प्लॅस्टिकचा (Plastic) झपाट्याने होणारा वापर एक दिवस पृथ्वीवर आढळणाऱ्या काही प्रजाती नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतो. सध्या जगभरात प्लास्टिकचा वापर खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे दररोज हजारो टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे.

अशा स्थितीत संयुक्त राष्ट्राने प्लास्टिकबाबत चिंता व्यक्त केली आहे. खरे तर जगभरात जो प्लास्टिक कचरा बाहेर पडतो, त्याचा पूर्णपणे पुनर्वापर होत नाही. अशा स्थितीत बहुतांश ठिकाणी प्लास्टिकचा कचरा समुद्रात टाकला जात असल्याने महासागरातील प्रदूषणाची (Pollution) पातळी झपाट्याने वाढत आहे.

समुद्रातील प्रदूषणात (Sea Pollution) वाढ झाल्यामुळे दरवर्षी समुद्रात आढळणाऱ्या जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळेच 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा (Fish) जास्त प्लास्टिक असेल, असा इशारा देत संयुक्त राष्ट्रांनी प्लास्टिकचा वापर आणि समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा इशारा दिला आहे.

यामुळेच 27 जून 2022 ते 1 जुलै 2022 या कालावधीत केनिया आणि पोर्तुगालच्या सरकाराने संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये समुद्रातील वाढते प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला होता. या वर्षी युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्र यांच्या सहकार्यातून संयुक्त राष्ट्र महासागर परिषद सुरू (United Nations Ocean Council ) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला