रशिया भागात डझनभर घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळावरून सुमारे 50 उड्डाणे वळवावी लागली. मॉस्कोच्या आजूबाजूच्या भागांवर हल्ला केल्यास राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. रशिया ही जगातील सर्वात मोठी आण्विक शक्ती आहे आणि क्रेमलिनने सांगितले की त्यांनी मॉस्कोच्या आसपासच्या भागात उड्डाण करणारे 20 युक्रेनियन ड्रोन पाडले.
रशियाने पुढे सांगितले की त्यांनी युक्रेनमधून रशियाच्या इतर भागांमध्ये उडवलेले 124 ड्रोन नष्ट केले. या हल्ल्यात मॉस्कोच्या आजूबाजूच्या परिसरातील घरांचे नुकसान झाले आहे मात्र यात जास्त जीवितहानी झाली नाही आणि या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. रशियाने इतर 8 प्रांतांमध्ये 124 ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेही युक्रेनवर 46 ड्रोनने हल्ला केला आहे. तथापि, युक्रेनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी यापैकी 38 ड्रोन पाडले.
यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी युक्रेनने 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला होता. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनने रशियावर हल्ला केला होता. त्यानंतरही युक्रेनने राजधानी मॉस्कोला लक्ष्य केले होते. रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने 15 प्रांतांवर 158 ड्रोनने हल्ला केला. ते म्हणाले की रशियन हवाई संरक्षणाने जवळजवळ सर्व ड्रोन रोखले आणि खाली पाडले.