ताज्या बातम्या

रशियात गृहयुद्धाचे सावट? रशियातील बंडावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची खोचक टीका

रशियाने आपल्या कमकुवतपणाचा आणि त्याच्या सरकारच्या मूर्खपणाचा मुखवटा लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता आता एवढा गोंधळ माजला आहे की कुठलेही खोटे ते लपवू शकत नाही. अशी टीका त्यांनी केली.

Published by : Sagar Pradhan

काही महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारले. या युध्दाची तेव्हापासून प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र, हे भयानक युध्द सुरू असताना आता रशियामधून मोठी समोर आली. विरोधकांचा सामना करण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तयार उभा केलेला वॅग्नर हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता पुतिन विरोधात उभा ठाकला आहे. या बंडानंतर वॅग्नरनं रशियात नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणाच केली. हा सर्व घडामोडीत पुतिन यांच्या अडचणी वाढत असताना यावरच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले झेलेन्स्की?

रशियांच्या परिस्थितीवर वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, प्रत्येकजण जो वाईट मार्ग निवडतो तो स्वतःचा नाश करतो. जो दुसऱ्या देशाचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्य पाठवतो आणि त्या सैन्यकांना पळून जाण्यापासून रोखू न शकणाऱ्याचे हेच होणार. आपल्या क्षेपणास्त्रांनी दहशत माजवत, जो लोकांचा तिरस्कार करतो आणि शेकडो हजारो लोकांना युद्धात फेकतो, आणि शेवटी मॉस्कोत स्वतःला कोंडून ठेवतो. रशियाने आपल्या कमकुवतपणाचा आणि त्याच्या सरकारच्या मूर्खपणाचा मुखवटा लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता आता एवढा गोंधळ माजला आहे की कुठलेही खोटे ते लपवू शकत नाही. अशी टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, रशियाची कमजोरी स्पष्ट आहे. पूर्ण प्रमाणात कमजोरी. आणि रशिया जितका जास्त काळ आपले सैन्य आणि भाडोत्री सैनिक आपल्या भूमीवर ठेवेल, तितकीच अराजकता, वेदना आणि समस्या नंतर स्वतःसाठी होतील. हेही उघड आहे. युक्रेन युरोपला रशियन वाईट आणि अराजकतेपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. आम्ही आमची लढाऊ शक्ती, एकता आणि शक्ती ठेवतो. आमचे सर्व सेनापती, आमच्या सर्व सैनिकांना काय करावे हे माहित आहे. असा टोला त्यांनी पुतिन यांना लगावला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...