UK PM Boris Johnson Resigned : बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वादांमध्ये अडकलेल्या जॉन्सनच्या सरकारमधून बारापेक्षा अधिक खासदारांनी राजीनामा दिला आहे. बोरिस जॉन्सन 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर म्हणाले, "संसदेत पक्षाला नवा नेता असावा, अशी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची इच्छा आहे, याचा अर्थ नवीन पंतप्रधान असावा." 58 वर्षीय बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केलं की, त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध अनेक राजीनामे दिल्यानंतर त्यांचा एक जवळचा सहकारी देखील राजीनामा देत आहे. परंतु नवीन पंतप्रधान निवडून येईपर्यंत ते पदावर राहतील.
पंतप्रधानपदाची 3 वर्ष ही अत्यंत वादग्रस्त ठरली असून, त्यानंतर अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे. कोरोना महामारीच्या काळातील कामामुळे त्यांची विश्वासार्हता सतत धोक्यात आली होती. बीबीसी आणि इतर मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार नेतृत्वाची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणूक पार पडण्याची शक्यता असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीला पक्षाच्या वार्षिक परिषदेत बोरिस जॉन्सनची यांची जागा नवीन नेता घेईल. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी होती. बीबीसीने ही माहिती दिली आहे. नवनियुक्त मंत्र्यांनीही त्यांचा मंत्रीपदांचा राजीनामा दिला असून. 50 हून अधिक सदस्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.
यापैकी 8 मंत्री आणि दोन राज्य सचिवांनी गेल्या 24 तासांत राजीनामे दिले आहेत. यामुळे जॉन्सन हे एकटे पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन्सन यांना आता बंडखोर नेत्यांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळालं असून, त्यामुळे या पक्षाच्या नेत्यालाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार आहे.