ताज्या बातम्या

‘उद्धव ठाकरेला संपवून दाखवा’ भर पावसात उद्धव ठाकरेंचं मोदी-शाहांना ओपन चॅलेंज

Published by : shweta walge

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काल (23 एप्रिल) रोजी परभणीत सभा पार पडली. ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान सभा सुरु असताना जोरदार पाऊसाने हजेरी लावली. पावसामुळे ही सभा थांबली नाही उद्धव ठाकरे यांनी या सभेत बेधडकपणे भर पावसात भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्हाला कल्पना आहे, एक-दोन दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल चिन्ह आहे त्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी, जय शिवाजी, आता त्या गाण्यातला मोदी-शाहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द? मी तर मोदी आणि शाह यांना सांगतो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना? बघा प्रयत्न करुन. हा उद्धव ठाकरे उभा आहे आणि त्याच्यासमोर हे सर्व मर्द मराठे उभे आहेत. तुमच्या मनात जय भवानी शब्दाबद्दल इतका द्वेष आणि आकस का आहे? यांना काय वाटतं? दिल्लीत बसले म्हणजे आपण म्हणू तसं सगळा देश ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, गुरं-ढोरं नाहीत. अंगावर आलात प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केला तेव्हा ही माझी वाघनखं बाहेर आलेली आहे. हे मुनगंटीवारांसाठी शोबाजी करत नाही. आम्ही वाघनखं परत आणणार. बसा. स्वत:ची नखे काढत बसा”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा